Posts

Showing posts from January, 2022

"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

Image
"ती...अनोखी"  भाग - 3  (  a story for empowering women )   एका मुलीच्या जीवनावर आधारित.....      ( Note - If you don't understand this language, please use translate ) "She...Anokhi" part - 3 आता घरात लहान मुल येणार होतं. त्यामुळे सवर्जण अगदी आनंदात व उत्साहात होते. सासुबाईंनी आनंदीबाईना जवळ घेतले व काळजी घ्यायला सांगितली. सासूबाई, "सुनबाई...आगं आता काळजी घ्यायची हा. भरपूर खायचं - प्यायचं आणि हो जास्त उठ बस करायची नाही. वाकून कामे करायची नाही...काही लागलं, तर मला मागत जा बरं का ?" सुनबाई, "हो..." आता दररोज आनंदीबाईची चांगल्या रीतीने काळजी घेणे सुरु होते. दररोजचं काम सासूबाईच  करू लागल्या. सासूबाई स्वतःच्या हाताने सुनबाईना खायला घालत. त्या त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असत. दररोजच्या गोळ्या-औषध वेळेवर देत. आणि भरपूर आराम करायला लावत. त्याचप्रमाणे दर महिन्याला दवाखान्यात तपासणीसाठी जात असत. अशाप्रकारे आता घरातील सर्व वातावरण बदललं होत..... [ यापूर्वी जरी आनंदीबाईन थोडा फार कामाचा त्रास सहन करावा लागत असे. सासूबाईचे, कधी पतीचे बोलणे खावे लाग...