"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story
"ती...अनोखी" भाग - 2 ( a story for empowering women ) एका मुलीच्या जीवनावर आधारित..... ( Note - If you don't understand this language, please use translate ) "She...Anokhi" part - 2 पहाटे, आनंदीबाई नेहमीप्रमाणे सर्व कामे आवरून तुळशीला पाणी घालून, स्वयंपाक घरात जेवण बनवायच्या तयारीसाठी गेल्या. अलमारीतील ताट घेत असताना अचानक चक्कर येऊन पडल्या. सासुबाईंनी बघताच रामरावांना आवाज दिला. रामराव व आबा धावतच आले. आनंदीबाई जमिनीवर कोसळून बेशुद्ध झालेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. रामरावांनी आनंदीबाईना उचलून खोलीत नेले व पलंगावर झोपवले. रामराव डॉक्टरांना फोन करण्यासाठी गेले. तोपर्यंत आनंदीबाईच्या पायाला गरमी येऊन त्या शुद्धीवर तरी येतील, यासाठी सासूबाई त्यांचे तळपाय जोरात आपल्या हाताने घासू लागल्या. रामराव डॉक्टरांना फोन करून आले. सासूबाई, "रामा... काय झालं? यत हाईत का डाक्तर साहेब ?" रामराव. "हो. हो आई थोड्याच वेळात येत आहेत....आपल्याच गावातले आहेत ना ते डॉक्टर स्वामी त्यांना बोलावलं....येतो बोलले ते..." थोड्...