"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

"ती...अनोखी" भाग - 2  ( a story for empowering women )  एका मुलीच्या जीवनावर आधारित.....   


 ( Note - If you don't understand this language, please use translate )


"She...Anokhi" part - 2



पहाटे, आनंदीबाई नेहमीप्रमाणे सर्व कामे आवरून तुळशीला पाणी घालून, स्वयंपाक घरात जेवण बनवायच्या तयारीसाठी गेल्या. 


अलमारीतील ताट घेत असताना अचानक चक्कर येऊन पडल्या. सासुबाईंनी बघताच रामरावांना आवाज दिला. रामराव व आबा धावतच आले. आनंदीबाई जमिनीवर कोसळून बेशुद्ध झालेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. रामरावांनी आनंदीबाईना उचलून खोलीत नेले व पलंगावर झोपवले. रामराव डॉक्टरांना फोन करण्यासाठी गेले. तोपर्यंत आनंदीबाईच्या पायाला गरमी येऊन त्या शुद्धीवर तरी येतील, यासाठी सासूबाई त्यांचे तळपाय जोरात आपल्या हाताने घासू लागल्या. रामराव डॉक्टरांना फोन करून आले.

सासूबाई, "रामा... काय झालं? यत हाईत का डाक्तर साहेब ?" 

रामराव. "हो. हो आई थोड्याच वेळात येत आहेत....आपल्याच गावातले आहेत ना ते डॉक्टर स्वामी त्यांना बोलावलं....येतो बोलले ते..."

थोड्याच वेळात डॉक्टर घरी आले....

आनंदीबाई अजून हि बेशुद्ध अवस्थेतच होत्या. डॉ. स्वामींनी आनंदीबाईचे डोळे तपासले, नाडी तपासली....व त्यांनी कागदावर काही गोळ्या औषधं लिहून दिली. व कागद रामरावांकडे दिला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना (आनंदीबाई) एक इंजेक्शन दिल. त्यांनतर आनंदीबाई थोड्या वेळात शुद्धीवर येतील अस सांगितल. 

डॉ. स्वामी (गोळ्या औषधं लिहिलेला कागद देत) म्हणाले . "रामराव हे घ्या. या सर्व गोळ्या औषध यांना वेळेवर द्या....आणि आराम करायला सांगा. त्यांना कामाचा जास्त भार आल्यामुळे चक्कर आली." 

.........व डॉक्टर निघून गेले. 

थोड्या वेळातच आनंदीबाई शुद्धीवर आल्या. रामराव म्हणाले. "आई. मी या गोळ्या घेऊन येतो. तू तिची काळजी घे." असं म्हणून रामराव निघून गेले......

सासूबाई, "सुनबाई आराम कर हा....आम्ही हाईत भाईर...." आणि बाहेर निघून गेल्या.

सासूबाईंच वाकड तोंड व बळच आराम कर बोलन आनंदीबाईच्या लक्षात आले होते. आनंदीबाई मनात बोलू लागल्या, "आईंना नक्कीच वाटल असेल कि, मी त्यांना गोड बातमी देईल....पण तस झालं नाही. म्हणून आता त्या वाकड तोंड करत आहेत....मी त्यांना निराश केल...." असा विचार करत करत त्यांचा कधी डोळा लागला कळलेच नाही. 

इकडे रामराव गोळ्या-औषध घेऊन आले....

सासूबाई (आई), "काय रे रामा......आलास का.......दे बाबा तिला आता ते सगळ आणि घे काळजी.....वाटलं होत गोड बातमी देते कि काय ? पण.....असो...देवा नारायणा कस होईल रे बाबा...."

रामराव बोलले, "आई तुला जर नातू हवा असेल, तर जरा आनंदीबाई वर काम थोपवण कमी कर...तिला आज पासून तू रानात पाठवायचं नाही... म्हणजे नाही ....तुला मिळेल नातवाच तोंड बघायला..ती आता बरी नाही तर तू घे जरा तिची काळजी " असं म्हणून ते खोलीत गेले.

आनंदीबाई झोपेत होत्या, म्हणून रामरावांनी त्यांना उठावल नाही....गोळ्याची पाकीट बाजूला ठेऊन त्याचं जवळ बसून राहिले. थोड्या वेळानं रात्रीच्या जेवणाची वेळ झाली....सासुबाईंनी स्वयंपाक बनवला होता.....

रामरावांनी पत्नीला जेऊ घातल आणि गोळ्या घ्यायला सांगितल्या....गोळ्या घेऊन आराम करायला सांगितला.....

 रात्र झाली तरी  ते तिथेच बसून होते, पत्नीची काळजी घेत.....


दोन - तीन महिने असेच निघून गेले......यात आनंदीबाई बऱ्या झाल्या घरातील कामे आवरून आराम करू लागल्या......





तीन महिन्यानंतर........


या तीन महिन्यानंतर चित्र पालटलेल होत. आनंदीबाईनी आई साहेबांना गोड बातमी दिली होती. आता रामराव बाबा होणार होते. सगळ घर आनंदाने कस भरून आलेलं होत.

झालं असं कि [एक दिवस जेवत असताना आनंदीबाईना घास घेताना  उलटी आल्यासारखे झाले. त्या एकदम उठून उलटी करायला गेल्या. त्या होत्या गर्भधारणेच्या कोरड्या उलट्या.....मग काय ? रामराव व आंदिबाई गेले डॉ. स्वामींकडे. स्वामींनी सांगितले कि, "रामराव ....आपल्या पत्नी गर्भवती आहेत" हे ऐकून रामराव व आनंदीबाई या दोघांच आनंदच ठिकाण नाही राहील.....ते घरी पोहोचले व हि बातमी आईला सांगितली आई व आबा देखील खूप आनंदित होते....अक्ख घर कस आनंदाने ओसंडून वाहत होत....]


अशा रीतीने अतातः आता घरात पाहिलं-वहिलं बाल येणार होत......


( बिचार्या आनंदीबाई त्यांना ना स्वतःच मत होत ना त्यांचे काही  विचार... त्या आत्तापर्यंत रांधा, वाढा, उष्टी काढा व आपलं सुनपण पूर्णपणे निभावत आल्या होत्या. तरीही त्यांना घरातून जिव्हाळा प्रेम मिळत नव्हत. विशेष म्हणजे सासूबाईकडून ......आता तीन महिन्यानंतर लेकरू येणार म्हटल्यावर तरी सासूबाई जरा प्रेमाने वागतात का ते बघण्याची उत्सुकता..... )


बघूयात सासूबाई पुढे कशा वागतात ? आणि जर का आनंदीबाईना मुलगी झाली तर ? सासूबाई तर आधीच "अशा मला नातवाच तोंड बघायचं", "मला नातवाच तोंड बघायचं" करतात .....मग...मग  घरात नातव ऐवजी नात आली तर काय होईल ?.....

"A Woman can have her own thoughts and opinions or dreams about life....She is not to do men's service only, she is also a human like you so, let her live personal life....ask her what does she really wants ? Give a own space to her to think about herself.....Don't cage or make her blind like by throwing home chores on her and not taking her opinions in things which are related to her own life......Let her speak. Let her live as per own way and for god sec, Don't apply your decisions on her...." 

{ स्त्रीला स्वतःचे विचार आणि मते किंवा स्वप्ने असू शकतात .... ती फक्त पुरुषांची सेवा करण्यासाठी नाही, ती सुद्धा तुमच्यासारखीच एक मानव आहे म्हणून तिला वैयक्तिक आयुष्य जगू द्या .... तिला विचारा की तिला नेमकं काय हवं आहे ? तिला स्वतःबद्दल विचार करण्यासाठी स्वतःची जागा द्या ..... तिच्यावर घरची कामे फेकून तिला पिंजरा लावू नका किंवा तिला अंध बनवू नका आणि तिच्या स्वतःच्या जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये तिची मते घ्या ...... तिला बोलू द्या. तिला स्वतःच्या मार्गाने जगू द्या आणि देवासाठी, आपले निर्णय तिच्यावर लागू करू नका. } 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिय वाचक वर्ग  या गोष्टीतील आनंदीबाई कोण आहेत व जी अनोखी आहे ती कोण आणि मुलगा बनून राहणारी मुलगी कोण ? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले असतील परंतु सर्व प्रश्नांची उत्तरे तेव्हाच मिळतील जेव्हा आपण दर रविवारी पुढील सर्व भाग वाचाल. 

 

पुढचा "ती...अनोखी" भाग - 3  नक्की वाचा. 

(You will get next part on each Sunday...Follow for next part)


 If you like the Content please follow & do comments !!  🙏🏼🙏🏼

SHARE it to your friends because 'SHARE is to CARE.'


"A Light loses nothing by lightening another LIGHT"


Dear readers, waiting for your comments....🙏🏼🙏🏼


 

Comments