"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

 

"ती...अनोखी" a story for empowering women  एका मुलीच्या जीवनावर (girl's life) आधारित.....


( Note - If you don't understand this language, please use translate )
            

एका मुलीच्या जीवनावर (girl's life)आधारित.....या लेखापासून एक गोष्ट लिहिण्यास सुरुवात करत आहे. या लेखाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न असणार आहे. या लेख मालिकेचे नाव "ती...अनोखी"असून हि मालिका एका मुलीच्या जीवनावर आधारित असणार आहे. आज समाजामध्ये अनेक घटना घडताना पहावयास मिळतात. विशेषकरून कोरोना काळात महिलांवरील अन्याय-अत्याचार, शोषण यासारख्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. हे फक्त कोरोना काळातच नव्हे तर अगोदरपासूनच पहावयास मिळत आहे.  

आज आपण आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे कुठल्याही भागात वावरू शकतो; कारण भारतीय संविधानाने आपणा सर्व नागरिकांना तसा हक्क दिलेला आहे. परंतु तसा सरसकट (सर्वांचा) विचार केल्यास, या हक्काचा महिलांना / मुलींना उपभोग घेता येतोय का ? त्यांना मोकळेपणाने जगता येतंय का ? असा विचार नक्कीच येईल.  


जरी काही प्रमाणात स्त्रिया अगदी पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत असतील; तरीही आज हि अशा अनेक महिला आहेत. ज्या कौटुंबिक हिंसाचार, अन्यायास बळी पडतात. ज्यांना पुरुषांपेक्षा निम्न दर्जा दिला जातो. शहरी भागांमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य असेल; पुरुषांच्या स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतील, त्यांना स्वतःचं मत व्यक्त करण्याची स्वतःच्या विचाराप्रमाणे जगण्याची संधी मिळत असेल; परंतु आजही ग्रामीण भागामध्ये स्त्रिया या फक्त पुरुषांची सेवा करण्यासाठीच आहेत, त्यांना स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार नाही, स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार नाही, रांधा वाढा उष्टी काढा, मूलबाळ सांभाळा, पतीच्या अदबित रहा, स्वतःच आयुष्य इतरांच्या सेवेत व्यतीत करणे, एवढेच मानलं जात, तिच्यावर अनेक अन्याय-अत्याचार होतात, कौटुंबिक हिंसाचार सहन करावा, तिच्यावर अनेक बंधने लादली जातात, तिला घट्टपणे कुंपणात बांधलं जातं आणि विचारलं जातं  तुझी लायकी तेवढीच आहे का ? आपण अनेक वेळा हे वाक्य ऐकलं असेल की, "मुलगी शिकली प्रगती झाली" परंतु फक्त शहरी भागात सुधारणा झाली म्हणजे जग सुधारलं का ? खरच हे वाक्य उच्चाराव अशी सुधारणा झालेली आहे का ? शहरी भागात विकास झाला. ग्रामीण भागात काय? महिलांच्या बाबतीत अनेक योजना बनवलेल्या दिसून येत असेल; परंतु ते त्या योजना आखलेल्या पाना पुरतेच मर्यादित का राहावे? सर्वांना समान अधिकार आहे. जीविताचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. अशा गोष्टी केल्या जातात,परंतु त्या प्रत्येक स्त्री पर्यंत पोहोचल्या आहेत का ? की फक्त भारतीय राज्यघटनेच्या पानातच लपून राहिल्या? स्त्रीला का कमकुवत मानलं जातं? पुरुष म्हणजे शूर, धडधाकट, कणखर आणि मजबूत स्त्री म्हटलं की कमकुवत, नाजूकपणा, हळवेपणा, घाबरट असं का ? तिची शरीरयष्टी पुरुषापेक्षा वेगळी आहे म्हणून का ? कि तीच लिंग वेगळ आहे म्हणून ? पुरुषापेक्षा स्त्रीचं लिंग वेगळ आणि शरीरयष्टी वरून जर तुम्ही स्त्रीचा मजबूतपणा  ठरवत असाल तर ते नेहमीच अयोग्य. स्त्रीचे लिंग वेगळे आहे. ते पुढची पिढी घडवण्यासाठी, इतरांना जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे लक्षात घ्यावे.

पुरुषांचे मत म्हणजे सर्वश्रेष्ठ मत आणि स्त्री म्हणजे तिला मत नसते. लोक सांगतील तसे वागायचे. कुटुंबातील लोक म्हणतील तेच करायचं. तुम्हाला जसं मत आहे, स्वतःचा विचार आहेत, इच्छा-आकांक्षा वेगवेगळ्या आहेत तशीच स्त्रीला हि असतील...तिला पारखण्याचा प्रयत्न का केला जात नाही ? तिलाही स्वतःचे मत आहे, स्वप्न आहे, परंतु पुरुषांचा, कुटुंबाचा निर्णय तिच्यावर लादले जातात आणि तिला इतरांसाठी राबनं शिकवलं जातं. त्यामुळे स्त्री स्वतःसाठी जगायचं विचारते. स्वतःचं मत काय आहे?  स्वतःचे विचार इतरांपेक्षा समाजापेक्षा वेगळे असू शकतात. याची तिला जाणीव कधी होऊ दिली जात नाही. तिला कमीपणा दिला जातो. 


"स्त्री नऊ महिने बाळाचा गर्भाशयात सांभाळ करून, बाळाला जन्म देते जीवनभर ती इतरांसाठी जगते. स्वतःचा कधी विचार करत नाही आणि निस्वार्थ प्रेम करते." अशा बोलण्याने आपण तीला स्वत:कडे बघण्यासाठी वेळ देत नाही आणि तिला स्वतःपासून दूर जाण्यास अधिक संधी देतो. नाही ? यापेक्षा हा विचार केला गेला पाहिजे की पुरुषाप्रमाणे स्त्री ही एक मानव आहे. तिला ही संधी दिली पाहिजे. स्वातंत्र्य दिले पाहिजे. स्वतःचं मत व विचार मांडण्याची संधी दिली पाहिजे. पायाखालची धूळ न समजता माणूस म्हणून वागवलं पाहिजे. स्त्री जर आयुष्यभर इतरांसाठी स्वतःला समर्पित करत असेल, तर तिच्या जगण्याचा काय अर्थ निघेल ?  सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जनजागृती केली पाहिजे. स्त्रीला माणूस म्हणून वागवलं पाहिजे. जनजागृती होईल तेव्हा स्त्री इतरांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगण्या शिकेल. काही प्रमाणात असेही दिसून येते की, ग्रामीण भागात जरी एखाद्या स्त्रीने स्वत:चे विचार इतरांपेक्षा वेगळे मांडण्यास किंवा वेगळे मत दाखवलं तरी तिला बोलण्याची संधी न देता समाजापेक्षा काही वेगळं करण्याची संधी न देता तिची मुस्कटदाबी केली जाते. का? स्त्रियांच्याच बाबतीत असं का घडतंय?  स्त्रीचं अस्तित्व काय आहे? तिच्यावर का होतात एवढे अन्याय?  तिला एवढा त्रास का सहन करावा लागतो ?  तिच्या शरीरयष्टी व लिंगावरून, मानसिकता न पारखता का कमकुवत मानले जात ? सर्व बंधने, निर्णय, मत  तिच्यावर का लागली जातात? आणि शेवटी सहानुभूती दाखवून अधिक महत्त्व कमी केलं जातं. स्त्रीच्या स्वातंत्र्य अत्याचार कौटुंबिक हिंसाचार हे सर्व प्रश्न व एका बाजूला असताना दुसरी बाजू दिसते, जाती-धर्माची समाजात आजही वरिष्ठ कनिष्ठ जात मानली जाते. या सर्व बाबींचा एकमेकांशी काय संबंध याचा आपण पुढील लेखात उलगडा करू.....

जरी या लेखात नेमके काय बोलायचे आहे व काय सिद्ध करायचे आहे याचा उलगडा होत नसेल तरी या पुढील लेखात नक्की होईल. हे सर्व प्रश्न मी का विचारत आहे? हे पुढे लिहीत असणाऱ्या लेख मालिकेत तुम्हाला स्पष्टपणे नक्की कळेल.   


तर प्रिय वाचक वर्ग "ती...अनोखी" चा भाग-१ लवकरच येत आहे.....नक्की वाचावा....


If you like the Content please follow & do comments !!  🙏🏼🙏🏼


SHARE it to your friends because 'SHARE is to CARE.'



"A Light loses nothing by lightening another LIGHT"



Dear readers, waiting for your comments....🙏🏼🙏🏼



Comments