"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story
"ती...अनोखी" भाग - १ ( a story for empowering women ) एका मुलीच्या जीवनावर आधारित.....
( Note - If you don't understand this language, please use translate )
"She...Anokhi" part - 1
गोष्ट (story) आहे 'हिरवेगाव'ची (Hiravegaon). हिरवेगाव (village) हे अतिशय निसर्गरम्य (nature) असे गाव. गावाच्या बाहेरून वाहणारी नदी (river), मारोतीचे मंदिर (god temple), हिरवी हिरवी झाडे, गावाच्या मध्ये एक मोठ पिंपळाच वृक्ष तिथे मुंजा, गावात शाळा सातवी पर्यंतच, शाळेत मुलांचा किलबिलाट, शाळेची घंटा वाजली कि, पक्षी (birds) जसे सायंकाळच्या वेळी आपल्या घरट्याकडे परततात; अगदी त्याचप्रमाणे सर्व मुले आपल्या घराकडे धाव घ्यायची..... असं चित्र. या गावातील रामराव यांच्या घरातील हि कहाणी.
पाहूया रामरावांच्या घरातील चित्र......
रामराव तसे B.A. झालेले व्यक्ती; परंतु व्यवसायाने ते दुकानदार (shopkeeper) होते. त्याचं गावातच कापडाच दुकान होतं. रामराव तसा हुशार माणूस; परंतु थोडा अहंकारी... दुकानदारी बरोबरच शेती हि करत असे. त्याची पत्नी आनंदीबाई, सातवी पास व गृहिणी होती. त्यांच्या सासूबाई म्हणजेच रामरावांची आई, थकलेल्या, कधीतरीच शेतात काम करत असत. रामरावांचे वडील हि थकलेले होते; परंतु शेतीचा खूप नाद त्यांना. कुणाचं काही आईकत नसत. आपल्याच कामात मग्न,असे ते. रामरावांना दोन भाऊ होते व दोघेही लहान. तिघा भावंडांमध्ये रामराव मोठे. दोन नंबरचा भाऊ निलेश, व्यवसायाने वकील (engineer) औरंगाबादला राहायचा व लहान भाऊ सुरेश प्राध्यापक (techer) मुंबईला रहायचा. त्यांना बहिण नव्हती. घरची अशी सर्व मंडळी होती. रामरावांच घर माळवदाच होतं. गावात घर असल्याने शेजार्यांची ये-जा असायची. त्यामुळे चहा-पान दिवसभर सुरु असे. सासूबाई जरा कडक असल्याने आनंदीबाई खूप दबून राहत असत. दिवसभर काम-काम कराव लागत असे. सासूबाई सुनाबाईना घरचं काम आवरून रानात पाठवत. खूप हाल-अपेष्ट सोसावी लागत असे आनंदीबाईना.
एकदा तर, सासूबाईंना लवकर जेवायला वाढलं नाही म्हणून त्यांनी सुनबाईंना (आनंदीबाई) मारहाण केली. आनंदीबाई खूप रडल्या; असं अनेक वेळा घडलं, रामरावांच्या समोर हि. पण काय करणार पर्याय नव्हता. मार सहन करावा लागत असे कारण पती (रामराव) काही म्हणत नसत. रामरावांच्या लग्नाला एक वर्ष होत आलं होत. सर्वांची अपेक्षा लागून होती कि, रामरावांना मुल-बाळ होईल.
(few days later) काही दिवस उलटले.....
एक दिवस, नेहमीप्रमाणे आनंदीबाई पहाटे उठून घरातील सर्व कामे आवरू लागल्या. आधी अंघोळीसाठी पाणी गरम करण्यास चुलीत सरपण घालून चूल पेटली. पाणी तापेल तोपर्यंत झाडलोट करून बाहेरील दारात शेणाचा सडा टाकला नि रांगोळी काढली. त्यानंतर चटकन अंघोळ उरकून घरातील इतर मंडळींसाठी पाणी तापवण्यास ठेवले. सासूबाई उठून अंगावर शाल ओढून, ओट्यावर जाऊन बसल्या व दातावर काळ मंजन चोळू लागल्या व शेजारच्याच्या सुनबाईशी बोलू लागल्या.
सासूबाई म्हणाल्या, "आगं ए...काय गं...नेहमीप्रमाणे आज तुमच्या सासूबाई दिसत नाहीत बाहेर, कुठे गेल्या म्हणायच्या ? ...नाहीतर ओट्यावर बसलेल्या असतात चहा घेत !!"
सुनबाई (शेजारची) - "हा ....अहो आत्या, त्या गेल्या त्यांच्या भहिणीकडं (sister), पहाटेच !"
"आ...आस व्हय..का मला वाटलं आज पांघरून सुटलं न्हाई कि काय...," सासूबाई (मंजन ओट्याच्या खाली कोपऱ्यात थुंकत ) म्हणाल्या. "चला घेतो आम्ही बी चहा !"
इकडे आनंदीबाईनि सगळी कामे आवरून घेतली आणि स्वयंपाकाला लागल्या....त्याआधी सर्वांना चहा द्यायचा होता. सासूबाई तोंड मोकळ करून आल्या. इकडे रामरावांची अंघोळ आवरून झाली होती. रामराव कपडे चढवत आईबरोबर बोलू लागले....
(आनंदीबाईनि चहा आणला. सासूबाई व रामरावांना दिला.)
रामराव (बशीत चहा ओतत म्हणाले ), "काय आईसाहेब, आबा (रामारावांचे वडील ) कुठे गेले एवड्या सकाळी सकाळी ? मला मनले दोस्ताकडे चालोय."
आई (आनंदीबाईच्या सासूबाई ) बोलल्या, "अरे रामा, हा...ते तुकाराम जिजा हाई ना त्यांच्या गाईला वासरू झाल म्हणे....तिकडेच गेलेत त्यांच्या गोठ्यात !!"
पुढे आई म्हणाल्या, "बरं, ते सोड. अरे काल, मी माझ्या समद्या मैतरणी बरोबर (friends) गप्पा मारत असताना, समद्या म्हणत होत्या कि, रामारावच्या लग्नाला एक वर्ष होत आलय, काय ? नातवाचं तोंड दाखवितो कि न्हाई लवकर तुला ??"
(रामरावांनी आईचं बोलन टाळत...)
"बरं, चल मी निघतो दुकान उघडायच आहे." आईचा आशीर्वाद (blessings) घेत रामराव म्हणाले.
आनंदीबाईनि आवाज दिला, "अहो...अहो, थांबा तुमचा रुमाल राहिलंय."
रामरावांनी मागे वळून आनंदीबाईकडे प्रेमाने (love) पाहिलं.
आनंदीबाई (रुमाल देत ), "ह्यो घ्या !"
आनंदीबाई लाजल्या व रामाराव गोड स्मित करत दुकानाकड रवाना झाले.
रामराव दुकानात गेले, सासूबाई दारात बसून गप्पा मारत होत्या. आनंदीबाई नि सगळी कामे आवरली व शेतात निघून गेल्या. आबा घरी येऊन खाऊन - पिऊन खाटावर पडून होते. अशाप्रकारे दिवस गेला.
सायंकाळी, आनंदीबाईनि झाडलोट करून तुळशीपाशी दिवेलागण केली.
रामराव घरी आले. हातपाय धुतले, चहा घेतला नि आई - आबाशी बोलू लागले.
रामराव ( हातपाय चोळत ) आबाला म्हणाले, "काय ओ आबा, सकाळी घाई घाई गेलात ?"
"आरं, त्या तुक्याच्या गाईला वासरू झाल! त्यान बोलाविल होत, घाई-घाई गेलो.",कानात बोट घालत आबा म्हणाले. "तू सांग तुझा काय इचार हाई ? आईच्या बोलण्याला तू मनावर घेतल न्हाईस...बघू द्या आम्हाला नातू, काय म्हणता ???"
रामराव 'बर' म्हणत आतल्या खोलीत गेले.
थोड्या वेळाने सर्वांची जेवणे खावने आवरली. आनंदीबाईनि कामं उरकून घेतली. आबा नि आई गेले गच्चीवर झोपायला.
रामराव व पत्नी त्यांच्या खोलीत,
रामराव म्हणाले, " तू थाकल्यासारखी (tired) दिसती !" हात व डोक्याला हात लावत ते म्हणाले, "तुला तर ताप (fever) हाई. तू आज रानात गेलतीस ?"
आनंदीबाई (अडखळत), "हो..."
रामराव. "पण का ??"
"आई....आई, न्हाई गेले तर रागावतात."
रामराव पत्नीचा हात हातात घेत बोलले."तुला कितीदा बोललो नको जात जाऊ. गडी हाई ना ? मग कशापाई...? याच्पुयाढे नाही जायचं....मी सांगतो आईला."
आनंदीबाइंनी नुसती मान डोलावली. रामराव बोलले, "खूप उशीर झालाय चल झोप. मला महित असत, सांगितल असत तर मी गोळी घेऊन आलो असतो ना येताना, आता दुकान बंद आसल....."
त्या रात्री, आनंदीबाईची प्रकृती बरी नसतानाही तिच्या मनाविरोधात, आई-आबाचं बोलनं लक्षात घेऊन त्यांनी बाळासाठीची (for baby / child) तयारी केली.....
आनंदीबाई गप्प अंथरूणावर पडून सकाळी रामराव गेल्यावर घरात काय झाल होतं, ते आठवू लागल्या.
[ (afternoon) दुपारी......रामराव दुकानात गेले. आनंदीबाई नि काम उरकून घेतले व बर वाटत नव्हत म्हणून जरा आराम करू लागल्या. तोच सासूबाई आल्या व बोलू लागल्या, "आगं ए, उठ पडलीय काय ? रानात जायचं आहे तुला....आणि काही-बाही बोलू लागल्या....
आनंदीबाई नि सांगितले कि, "आई मला बर वाटत न्हाई ओ.....म्हणून पडले जरा...आज नाही जात मी रानात."
सासूबाईनि आनंदीबाईना मारायला सरुवात केली....गालात चापट मारली, पाठीत झाडू ने मारण्यास सुरवात केली.
आनंदीबाई, "जाते, जाते " म्हणत उठल्या, ढसा ढसा रडत.....
तयारी करून रानाकडे निघून गेल्या...... ]
हा घडलेला प्रकार त्यांनी रामरावना सांगितला नाही कारण, त्यांना वाटले आपण यांना सर्व सांगितल तर सासूबाई अजून चिडतील, त्यामुळे त्या गप्प राहिल्या. हे सर्व आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
......तसच डोळे मिटत त्या झोपी (sleep) गेल्या.
दुसऱ्या दिवशी पहाटे, आनंदीबाई उठल्या व चुलीजवळ बसत असताना चक्कर येऊन पडल्या.......
( का आनंदीबाईना चक्कर आली ??.....पुढे काय होणार.....ते पुढील भागात.... )
{आनंदीबाई बरोबर कुठेतरी अन्याय होत होता. त्यांचावर #कौटुंबिक हिंसाचार #domestic violence होत होता. मनाविरोधात गोष्टी घडत होत्या....परंतु त्या गप्प सहन करत होत्या. आपल्या भारत देशात आज हि अशा अनेक आनंदीबाई आहेत, ज्या बदनामीच्या, अवमानाच्या भीतीने गप्प अन्याय-अत्याचार सोसतात.....आज काल कोण महिला / मुलीवर #बलात्कार झाला तरी काही नवीन वाटत नाही.जर कोणी म्हटलं कि अरे या मुलीवर / महिलेवर बलात्कार #rape झाला ...तर म्हणतात ओ अच्छा, बलात्कार झाला....अहो जिच्यावर झाला तिला विचारा, किती त्रास होत असेल......? त्यामुळे आज #जनजागृतीची #awareness and women empowermentची गरज आहे. प्रत्येक महिलेने तिचावर होत असलेल्या अन्यायाच्या #injustice विरोधात आवाज उंचावला पाहिजे, स्वतःहून तक्रार केली पाहिजे....तेव्हाच दुसरी आनंदीबाई तयार होणार नाही.}
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(You will get next part on each Sunday...Follow for next part)
If you like the Content please follow & do comments !! 🙏🏼🙏🏼
SHARE it to your friends because 'SHARE is to CARE.'
"A Light loses nothing by lightening another LIGHT"
Dear readers, waiting for your comments....🙏🏼🙏🏼
Comments
Post a Comment